वृक्ष माझा सखा – वृक्ष वल्ली आम्हा सोयरीं वनचेरें।
या श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाची प्रेरणा घेऊन वृक्ष माझा सखा हा उपक्रम राबविला शाळा, कॉलेजेस मधिल विद्यार्थ्यांना एक मूल एक झाड व झाडांना मुलाचे नाव देऊन त्याचे संवर्धनाची काळजी घेण्याची नोंद ठेवण्यास प्रवृत्त केले महाराष्ट्र शासनाच्या 13 कोटी वृक्ष एकच लक्ष या उपक्रमामध्ये जाणीव व जागृतीसाठी सहभाग घेतला.
पाणी आडवा पाणी जिरवा- वरुड व पंचक्रोशीतील पाणी फौंडेशन या महाराष्ट्र व्यापि उपक्रमासाठी अविरत पणे 45 दिवस वेद सामाजिक व शैक्षणिक संस्थेंच्या कार्यकर्त्यांनी हिरहिरीने सहभाग घेऊन विविध गावांमध्ये जाऊन भेटी दिल्या. पाणी फौंडेशनच्या सामन्वयक अभिनेत्री सौ. सोनाली कुलकर्णी यांच्या प्रेरणेने टाकेवडी ता. माण जि. सातारा या गावाचा संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक आला. त्यासाठी त्या गावचे वेद संस्थेचे मार्गदर्शक नितीन संभाजी पाटील यांनी प्रबोधनपर वेगवेगळ्या गावातील कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली विविध प्रशिक्षणे घेतली शांतीलाल मुथा जैन संघटना यांचे मार्गदर्शन घेतले. कृषी सचिव महा. एकनाथ डवले साहेब यांचे मार्गदर्शन घेतले. जलयुत शिवार हा उपक्रम यशस्वीरित्या सिन्नर येथील मित्र मंडळ प्रतिष्ठान यांचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक बांधिलकी निधी (CSR) यांची प्रशिक्षणे घेतली.
Posted inNews