स्थापना 18/05/2009

रजि. नं. फ/14057

सण 2009 मध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून पंचक्रोशीतील थोरा मोठ्यांच्या प्रेरणेने वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेची स्थापना केली “ग्रामविकास” हा ध्यास घेऊन गावांमध्ये तरुण हा तेजस्वी तपस्वी आणि तत्पर असला पाहिजे या हेतूने प्रथम व्यायामशाळा निर्माण करण्यासाठी समर्थ रामदास स्वामींनी बलोपासना करावी ही संकल्पना अमलात यावी यासाठी व्यायामशाळेसाठी मार्गक्ररण सुरू झाले.

“A healthy body has a healthy mind” निरोगी शरीरामध्ये निरोगी मन असते. म्हणून आत्मनिर्भर माणूस बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली. ईश्वराने कार्य सिद्धीस नेले आणि वेद संस्थेच्या माध्यमातून सुंदर व सुराज्य व्यायामशाळा तयार झाली.

Vision / ध्येय

विचार कृती आणि अपेक्षित परिणाम म्हणजे यश हेच सूत्र विचारात घेऊन ग्रामविकासामध्ये शिक्षण, प्रशिक्षण, कौशल्य विकास, रोजगार निर्मिती, महिला सक्षमीकरण, जेष्ठ नागरिक मान सन्मान, सेवा, मुलांचे शिक्षण, प्रौढ शिक्षण, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, परसबाग फुलविणे, जलव्यवस्थापन,
विविध प्रेरणादायी उपक्रमांना भेटी, पर्यावरण समृद्ध ग्राम, निरोगी पशुधन, प्रदूषण विरहित सामग्रीचा वापर, पुरातन / प्राचीन गोष्टींचे संवर्धन, सौरऊर्जा निर्मिती, संशोधन वृत्तीला प्रेरणा, प्रशासन आणि शासन यांचे माहितीसाठी प्रशिक्षण, तसेच वेद, मंत्र, ग्रंथ, रक्षण या गोष्टींसाठी संस्थेची निर्मिती.