कोणताही उपक्रम राबविण्यासाठी ध्यास असावा लागतो, भव्य वास्तूची गरज असते, कौशल्य असलेल्या निपून लोकांची गरज असते या सर्वांचा समन्वय साधने ही खरी व्यवस्थापनाची निकड असते त्यासाठी वेदमूर्ती पं. चित्तरंजन खटावकर यांनी अध्यक्ष वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था यांनी अत्यंत कुशलतेने जबाबदारी पेलली आहे. वेद मंगल कार्यालय, गोशाळा, रोजगार निर्मिती केंद्र यांसारख्या उपक्रमाने सुरवात करून हजारो मैलांचा प्रवास एका पावलाने सुरू केला.
“जगाच्या कल्याणा देह कस्टवावा करणारी लावावा सत्यासाठी”
अशा वर्तनाने जगाचे सार्थक ही भावना उराशी बाळगून सण 2018 चे पवित्र अधिक मासामध्ये विश्व कल्याणार्थ “श्री सहस्त्र चंडी” महायज्ञाचे आयोजन केले अध्यात्मिक गुरू ते राजकारणातील समाजकारणात दिग्गजांनी, प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी व पंचक्रोशीतील बळीराजा जण सामान्यांची मांदिआळी इथे अनुष्ठानास उपस्थित होते.
दिव्यत्वाची जेथ पश्चिती । तेथे कर माझे जुळती । या युक्ती प्रमाणे महाराष्ट्राचे पशु संवर्धन व दुग्धविकास मंत्री मा. ना. महादेवजी जानकर साहेब हे उपस्थित राहिले. विध्यमान आमदार मा. खाजदर रणजितसिंह मोहिते पाटील. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार वेल्हेकर सर तसेच पंचायत समिती सभापती संदीप दादा मांडावे तसेच श्रीमंत छ. कल्पनाराजे भोसले ऊर्फ आईसाहेब यांनी ही सिद्ध अनुष्ठानास उपस्थित राहून आशिर्वाद घेतले. संपूर्ण राज्य भरातून नाशिक, त्रंबकेश्वर, जालना, पैठण, राक्षस भवन, नारसोबावाडी, औंध, वरुड या विविध तिर्थ क्षेत्रामातून विद्यसंपन्न पुरोहित येऊन हा यज्ञ सुसंपन्न पार पडला.