समाजामध्ये समन्वय असला पाहिजे शिक्षणातून विद्यार्थी घडला पाहिजे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुवर्ण संधी मिळाली पाहिजे यासाठी वेद संस्थेने एक व्यक्ती एक विद्यार्थी दत्तक योजना राबविण्यासाठी प्रबोधन केले.
हिंगोली, उस्मानाबाद, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, बीड येथील गरीब गरजू अनाथ मुलांना निवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश देवून मुंबई, पुणे अशा शहरांमधील दानशूर शिक्षणाची आवड असणाऱ्या लोकांकडून मदत मिळवून दिली. त्याचा शेकडो विद्यार्थ्यांना लाभ झाला.
शासन स्तरावरती आश्रम शाळांना अनुदान मिळावे यस्थाव पाठपुरावा केला व त्यात यश आले. राज्यातील बहुतेक केंद्रीय आश्रम शाळांना 20% अनुदान प्राप्त प्रारंभ झाला. पुढे पडताळणीमध्ये यशस्वी झाल्यास 100% अनुदान प्राप्त होईल. तसेच आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन दिले.
Posted inNews