आत्मनिर्भर भारत अभियान

Finance is blood of organisation शरीरामध्ये रक्त नसेल तर शरीर चालणार नाही तसेच कुटुंब नावाच्या संस्थेमध्ये द्रव्य नसेल तर कुटुंब नावाची संस्था म्हणजे या राष्ट्रातील प्रत्येक घर उदवस्थ होईल म्हणून प्रत्येक घर दूरस्थ झाले तर राष्ट्र दूरस्थ होणार आहे यासाठी घर तिथे स्वयंरोजगार हाताला काम आणि कामाला दाम हा मूलमंत्र ध्यानात घेऊन विविध रोजगार निर्मितीसाठी एक सूत्रबद्ध कार्यक्रम संपूर्ण देशभर राबविण्यासाठी आरेखन केले. प्रगतीच्या वेगापेक्षा प्रगतीची दिशा महत्त्वाची आहे म्हणून वेद सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून दिशादर्शक कार्यक्रम तयार करण्यात आले आज दर महिन्याला एक फिक्स इन्कम निर्मिती करून प्रक्रिया ब्रँडिंग विक्री शुंखला तयार केली. परकीय उत्पादनांऐवजी स्वदेशीचा पुरस्कार केला.

संपूर्ण देशभरातील खेडी स्वयंपूर्ण व्हावीत लोकसंख्येचा सुयोग्य उपयोग व्हावा राष्ट्र उभारणीसाठी ताकत मिळावी म्हणून वेद सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था बेरोजगार युवकांना अहोरात्र मार्गदर्शन करत आहे. इतिहासातुन प्रेरणा घेऊन भविष्याचा वेध घेणारी पिढी घडवीत आहे. विध्यार्थी म्हणजे ज्ञानसागरात पोहणारा राजहंस आहे हे सिद्ध करून दाखवत आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करेल तो गुरूगुरल्या शिवाय राहणार नाही. लोकशाहीचे चारीही स्तंभ मजबूत असतील तर लोकशाही मजबूत राहील. यावर संस्थेचा पूर्ण विश्वास आहे. In Past Present and Future always one thing is common that is relationship and trust म्हणजेच भूत- भविष्य- वर्तमानकाळ या तिन्ही कळामध्ये एकच गोष्ट अटळ आहे ती म्हणजे नातं आणि त्यातून निर्माण होणारा विश्वास हे आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य आहे. कोणताही व्यावसायिक आपल्या सेवेच्या माध्यमातून व्यवसाय वृद्धी करू शकतो. हातोटी सचोटी वापरून विस्तार शृंखला तयार करू शकतो, परंतु त्यासाठी मूल्यांची जपणूक करावी लागेल.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *