मुलांचे पाय पाळण्यात दिसतात।
जगातील सर्वश्रेष्ठ गुंतवणूक म्हणजे मुलांच्या संवर्धनात केलेली गुंतवणूक ही जगातील सर्व श्रेष्ठ गुंतवणूक आहे. प्रत्येक वयोगटामध्ये 0-3, 3-6, 6-12, 13-16, 18-22, वेगवेगळ्या वयोगटामध्ये मुलाला विकासाची वेगळी संधी काय त्यांच्यामध्ये असलेल्या गुणवैशिष्टयांची जाणीव करून देणे आहे ही संस्थेच्या मूळ उद्दिष्टातील मुख्या उद्दिष्ट आहे. ज्ञान विज्ञान, सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार गतिमान शिक्षणातून समान परिवर्तन आणि स्वावलंबी शिक्षण हेच आपले ब्रीद अर्थात शिक्षणातून आत्मनिर्भर बनविण्याची प्रक्रिया म्हणजे विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास आहे. हे संस्कार बालपणातच व्हावेत ह्यासाठी संस्था पालक मार्गदर्शन जाणीव जागृती अभियान संपूर्ण राज्यभर ग्राम संमन्वयकाच्या माध्यमातून राबवित आहे संपूर्ण राज्यातील 30000 खेड्यांपर्यंत व्यक्तिमत्त्व विकासाचा उपक्रम पोहचवण्यासाठी संस्था अहोरात्र काम करित आहे.
नियोजन वेद विद्या संवर्धन शालेय शिक्षणा बरोबर 4 वेदांचे शिक्षण घेता यावे यासाठी वेद संस्थेने सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना त्याचे आकलन व्हावे त्यासाठी संस्थेने पहिली ते बारावी विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने शिक्षणाचे मार्गदर्शन देण्यासाठी संस्थेने भव्य वास्तू उभारली आहे. यासंदर्भातील प्रस्थाव शासन दरबारी प्रलंबित आहे.